Advertisement

मंत्रालयातील ३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाचा धोका वाढत असल्याने राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कठोर पावलं उचलण्यात येत असतानाच मंत्रालयातील ३५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आलं आहे.

मंत्रालयातील ३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाचा धोका वाढत असल्याने राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कठोर पावलं उचलण्यात येत असतानाच मंत्रालयातील ३५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आलं आहे. यामुळे मंत्रालयातील कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खासकरून अधिवेशनाच्या तोंडावरच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने विरोधकांकडून सरकावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात मंत्रालयातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यातच सोमवारी आणखी २३ कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोरोना (coronavirus) चाचणी पाझिटिव्ह आली आहे. हे कर्मचारी-अधिकारी महसूल, शिक्षण आणि अन्य विभागातील आहेत. त्यामध्ये त्यामध्ये १२ जण शिक्षण विभागातील आहेत. २ उपसचिव, ४ अवर सचिव, ३ कक्ष अधिकारी, ४ सहाय्यक कक्ष अधिकारी आणि ८ लिपिक इतक्या जणांचा समावेश आहे. तर वरळी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातही एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे.

हेही वाचा- लवकरच कोव्हॅक्सिन केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पर्याय

कोरोना चाचणी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलेले बहुतांश सर्वच कर्मचारी आणि अधिकारी हे आपापल्या कार्यालयात हजर असल्याने ते इतर अनेक सहकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

पूर्वीच्या तुलनेत निर्बंध शिथिल झाल्याने मंत्रालयातील वर्दळ वाढलेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसाला शेकडो अभ्यागत मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कामासाठी येतात. त्यामुळेच मंत्रालयात कोरोनाचा (covid19) शिरकाव झाल्याचं म्हटलं जात आहे. हा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेसह विविध मंत्रालयीन कर्मचारी संघटनांनी केली आहे.

दरम्यान, केवळ विधीमंडळ अधिवेशन टाळण्यासाठी सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे का?, असा खळबळजनक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी उपस्थित केला आहे. तसंच मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

(35 employees in mantralaya tested covid19 positive)

 हेही वाचा- रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी मुंबईतील सर्व रुग्णालये सज्ज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा