Advertisement

ठाण्यात शुक्रवारी सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

ठाणे शहरासह जिल्ह्यात मागील एका आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

ठाण्यात शुक्रवारी सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
SHARES

ठाणे शहरासह जिल्ह्यात मागील एका आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.  ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ३६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कल्याण-डोंबिवलीमध्येही ३५८ आणि नवी मुंबईत २२४ नवे रुग्ण सापडले आहेत. ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करा आणि प्रवेशावर निर्बंध लागू करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ४७९ झाली आहे. तर ९११ रुग्णांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे. ठाणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,४५६ झाली आहे. कळवा, मुंब्रा या ठिकाणी कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होता. आता लोकमान्य नगर, सावरकर नगर, मानपाडा, माजीवडा या भागात कोरोनाचा फैलाव मोठा झाला आहे.  माजीवडा-मानपाडा भागात १० दिवसांत २५० नवीन रुग्ण आढळले आहेत.


 ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी १४०० तर शुक्रवारी १३३२ नवे रुग्ण आढळले. दररोज ३०० ते ६०० पर्यंत जिथे नवे कोरोनाबाधित आढळायचे, तिथे आता हजारांच्या घरात नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळेच लॉकडाउन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारपासून पाच दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले आहे.



हेही वाचा -


Coronavirus Pandemic: मुंबईत १२९७ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

अरे बापरे ! राज्यात ५०२४ नवे रुग्ण, १७५ जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा