Advertisement

मुंबईत फटाक्यांमुळे 40 जण भाजले


मुंबईत फटाक्यांमुळे 40 जण भाजले
SHARES

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दिवाळीत मुंबईत हवेचं प्रदूषण कमी झालं असलं तरी फटाक्यांमुळे भाजणाऱ्यांच्या संख्येत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. यंदा दिवाळीत फटाक्यांमुळे जवळपास 40 जण भाजल्याची माहिती समोर आली आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एरोली येथील बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.


जेजेत 5 रुग्ण आढळले 

सर जमशेदजी जीजीभॉय रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुगणालयात फटाक्यांमुळे भाजलेल्या 5 रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचसोबत यातील सर्व रुग्ण हे किरकोळ भाजले असल्याकारणाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलं. शिवाय भाजलेले सर्व रुग्ण हे 7 ते 11 या वयोगटातील होते.

नॅशनल बर्न सेंटर, एरोली या रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, या रुग्णालयात एकूण 12 रुग्ण फटाक्याने भाजलेले आढळून आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा