Advertisement

कल्याण-डोंबिवलीत सोमवारी ४२७ नवे रुग्ण

येथील कोरोना रुग्णांनी आता १३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

कल्याण-डोंबिवलीत सोमवारी ४२७ नवे रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ४२७  रूग्ण सापडले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला  आहे. येथील कोरोना रुग्ण संख्येने आता १३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी ५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३२४०  झाली असून यामध्ये ६६३३ रुग्ण उपचार घेत आहेत. ६४०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १९८  जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन ४२७ रूग्णांमध्ये  कल्याण पूर्व -६२, कल्याण प.-११६, डोंबिवली पूर्व -१३७, डोंबिवली प-७७, मांडा टिटवाळा- १०, मोहना – २३ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. मागील ३ दिवस कोरोना रुग्णांची संख्या ६०० च्या वर जात होती. हीच रुग्ण संख्या सोमवारी ५०० च्या आत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.


सोमवारी राज्यात ६४२९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (उपचार सुरू आहेत.सोमवारी ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. 

 हेही वाचा -

Sealed Building List Mumbai : मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा