Advertisement

मुंबईकरांना दिलासा, म्युकरमायकोसिसचे ४३६ रुग्ण बरे

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मुंबई पालिकेला यश आलं आहे. त्यापाठोपाठ आता म्युकरमायकोसिस आजारावरही नियंत्रण मिळवण्यात पालिका यशस्वी झाली आहे.

मुंबईकरांना दिलासा, म्युकरमायकोसिसचे ४३६ रुग्ण बरे
SHARES

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मुंबई पालिकेला यश आलं आहे. त्यापाठोपाठ आता म्युकरमायकोसिस आजारावरही नियंत्रण मिळवण्यात पालिका यशस्वी झाली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिसून येत आहे. 

मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ८०४ रुग्णांपैकी ४३६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २१२ सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात मुंबईतील केवळ ७० सक्रिय रुग्ण आहेत. 

मुंबईत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये केवळ ३० टक्के रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण २३२ रुग्ण आढळले. यात ४७ जणांचा मृत्यू झाला. तर ११५  जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ ७० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मुंबईबाहेरचे ५३२ रुग्ण दाखल झाले. यातील १०९ जणांचा मृत्यू झाला. तर ३२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तर १४२ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ‘टास्क फोर्स’ने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार यंत्रणेनुसार काम करण्यात आले. पालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही म्युकोरमायकोसिसचे उपचार सुरू आहेत. या आजारावर प्रभावी असणारे इंजेक्शन एम्फोटेरेसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल वापरले जात आहेत. तसेच गरज भासल्यास नाक आणि डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून इन्फेक्शन काढून टाकण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.हेही वाचा -

मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा