Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४८६ नवीन कोरोना रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४८६ रुग्ण आढळले. . तर ९ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ४८६ नवीन कोरोना रुग्ण, ९ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४८६ रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत २०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३०,५४० झाली आहे. यामध्ये ३५५९ रुग्ण उपचार घेत असून २६,३१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व  ९२, कल्याण प.१३२, डोंबिवली पूर्व ११७, डोंबिवली प १००, मांडा टिटवाळा २७, तर मोहना येथील १८ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित केंद्रातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -

राज्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा