Advertisement

ब्रिटनहून मुंबईत ५९० प्रवासी दाखल; खबरदारीसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाइन

५ दिवसांनंतर त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

ब्रिटनहून मुंबईत ५९० प्रवासी दाखल; खबरदारीसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाइन
SHARES

मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना सोमवारी मध्यरात्रीपासून क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आतापर्यंत प्रवासात असलेली ५ पैकी ३ विमानं ब्रिटन येथून मुंबईत दाखल झाली आहेत. या ३ विमानांतून एकूण ५९० प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यापैकी अद्याप कोणाला लक्षणं आढळलेली नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

५ दिवसांनंतर त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसंच, त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेनं पंचतारांकित व फोर स्टार हॉटेलमध्ये २ हजार खोल्या राखीव ठेवल्या आहेत. सोमवार रात्रीपासून ३ विमानं मुंबईत आली आहेत. या प्रवाशांचं तापमान व अन्य तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

ब्रिटनमधून येणारे २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्यानं त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येणार आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आलं आहे.

विमानांनी आलेले प्रवासी

  • AI - १३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. ६३ मुंबई, ७५ महाराष्ट्र, ११२ राज्याबाहेरील आहेत.
  • VS - ३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबई, ३० महाराष्ट्र, ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत.
  • BA - १३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.  
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा