Advertisement

कल्याण डोंबिवलीत शुक्रवारी तब्बल ५९५ नवे कोरोना रूग्ण

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने कठोर निर्बंध लावले आहेत. त्यानुसार उपाहारगृह, स्वागतिका, मंगल कार्यालये सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

कल्याण डोंबिवलीत शुक्रवारी तब्बल ५९५ नवे कोरोना रूग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी पालिका क्षेत्रात कोरोनाचे तब्बल ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

शुक्रवारी २०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. येथील  उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ४३१२ झाली आहे. आतापर्यंत ६३७९७ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी कल्याण पूर्वमध्ये ९२, कल्याण पश्चिम १८१, डोंबिवली पूर्व १९०, डोंबिवली पश्चिम ८९, मांडा टिटवाळा ३७ तर मोहनामध्ये ६ रुग्ण आढळले आहेत. 

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने कठोर निर्बंध लावले आहेत. त्यानुसार उपाहारगृह, स्वागतिका, मंगल कार्यालये सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे, त्यामधील हळदीचे कार्यक्रम रात्री नऊ वाजेच्या आत उरकण्यात अनिवार्य आहे. हे कार्यक्रम करण्यापूर्वी प्रभाग अधिकारी, पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वधू-वर पिता, मंगल कार्यालय व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. घरपोच सेवा देणारी व्यवस्था रात्री १० वाजेपर्यंत काम करतील. अत्यावश्यक सेवेचे व्यवहार नियमित सुरू राहतील. मुखपट्टी वापरणे अनिवार्य आहे. करोना नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा