Advertisement

प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनमधून 2 महिन्यात 6 टन प्लॅस्टिक जमा


प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनमधून 2 महिन्यात 6 टन प्लॅस्टिक जमा
SHARES

पश्चिम रेल्वेने वॉकहार्ट फाऊंडेशन आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत पश्चिम रेल्वे स्थानंकावर बसवलेल्या प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनला प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 2 महिन्यांत रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनमधून तब्बल 6 टन प्लॅस्टिक बाटल्यांचा क्रश जमा झाला आहे.

चर्चगेट, वांद्रे आणि अंधेरी येथे बसवण्यात आलेल्या मशीनमधून 5 टन प्लॅस्टिक तर मुंबई सेंट्रल, सांताक्रूझ, गोरेगाव, बोरीवली येथील मशीनधून 1 टन प्लॅस्टिक क्रश जमा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत 2 हजार 100 नागरिकांनी मशीनमधील डोनेशन हा पर्याय निवडला असून, त्यातून 42 किलो प्लास्टिक बाटल्यांचा क्रश जमा झाला आहे.

पश्चिम रेल्वेने रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्यांना आळा घालण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत 5 जून 2016 ला चर्चगेट रेल्वे स्थानकांत पहिली रिसायकल बॉटल मशीन बसवली होती. पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पश्चिम रेल्वेने चर्चगेट आणि अंधेरी स्थानकात प्रत्येकी 2 तर मुंबई सेंट्रल, वांद्रे, सांताक्रूझ, गोरेगाव, बोरीवली या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी एक रिसायकल बॉटल मशीन बसवली आहे.

क्रशपासून तयार केलेल्या टी शर्ट मशीनमध्ये साचलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांचा क्रश एका फायबर कंपनीला दिला जातो आणि त्यापासून टी शर्ट तयार केले जातात. डोनेशन केलेल्या बाटल्यांच्या क्रशने तयार करण्यात आलेले टी शर्ट येत्या काळात वंचित मुलांना वॉकहार्ट फाऊंडेशनच्या वतीने मोफत दिले जाणार असल्याची माहिती प्रकल्प सल्लागार हरिश कारंडे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा