Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ७२ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२६ ऑक्टोबर) ७२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ९५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ७२ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२६ ऑक्टोबर) ७२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ९५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील २ तसेच कळंबोली आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३, नवीन पनवेल १२, खांदा काॅलनी २, कळंबोली ३, कामोठे १७, खारघर येथील ३५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १०, कळंबोली ८, कामोठे २९, खारघर ३७ तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३१२१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१६९७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५३९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ८८५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवरसंबंधित विषय