Advertisement

राज्यात कोरोनाचे 771 नवे रुग्ण, 24 तासात 35 जणांचा मृत्यू


राज्यात कोरोनाचे 771 नवे रुग्ण, 24 तासात 35 जणांचा मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात  सोमवारी कोरोनाचे 771 नवे रुग्ण आढळून आले आहे. 350 वारी  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 11 हजार 082 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  सोमवारी कोरोना या महामारीने 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 541 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. सोमवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख 76 हजार  323 नमुन्यांपैकी  1 लाख 62 हजार 349 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  14 हजार 541 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख  98 हजार  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 006 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर रविवारी या महामारीने राज्यभरात 27 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 583 इतकी झाली आहे.

सोमवारी मृत पावलेल्या 35 नागरिकांमध्ये मुंबईतील 18 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 7 आहेत. अकोलातील  5, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या 35 मृत्यूमध्ये 22 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.  या 35 मृतांपैकी 23 जणांमध्ये (70 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा