Advertisement

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ८७४४ रुग्ण, ९०६८ रुग्ण बरे

राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ७७ हजार ११२ रूग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.२१ टक्के एवढे आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ८७४४ रुग्ण, ९०६८ रुग्ण बरे
SHARES

राज्यात सोमवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सोमवारी ८७४४ नवीन रुग्ण आढळले. तर ९ हजार ६८ रूग्ण बरे झाले.  याशिवाय २२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात ५२,५०० जणांचा मृत्यू झााला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ७७ हजार ११२ रूग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.२१ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख २८ हजार ४७१ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४१ हजार ७०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

 राज्यात सध्या ९७,६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक १९ हजार ३० अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा वाढून आता १२ हजार २९१ इतका झाला आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात चिंता वाढत चालली आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत ही संख्या सध्या ९ हजार ३७३ इतकी झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा