Advertisement

कल्याण डोंबिवलीत ८८ कोरोना रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी अवघे ८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ८८ कोरोना रुग्णांची नोंद
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी अवघे ८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

याआधी ११ जून रोजी ८७ रुग्णांची आणि ५ मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर १ नोव्हेंबर रोजी १३० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सोमवारी २ नोव्हेंबर रोजी तब्बल १४३ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत आली आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,२८२ झाली आहे. यामध्ये १५२७ रुग्ण उपचार घेत असून ४७,७४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १६, कल्याण प ३२, डोंबिवली पूर्व १९, डोंबिवली प १८, मांडा टिटवाळा १, मोहना १, तर पिसवली येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३७ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तसेच १ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा

प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडल्यानं पालिकेला दंड

राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी सप्ताह’Read this story in हिंदी
संबंधित विषय