Advertisement

राज्यात बुधवारी ८८०७ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ८८०७ रुग्ण आढळले.

राज्यात बुधवारी ८८०७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ८८०७ रुग्ण आढळले. तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. २७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

 मंगळवारी राज्यात ६२१८ नवे करोनाबाधितांची नोंद झाली होती. बुधवारी रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के  आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात  ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.३६ टक्के इतके आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा