Advertisement

राज्यात ८९९८ नवीन कोरोना रूग्ण, ६० रुग्णांचा मृत्यू

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. आतापर्यंत एकूण २०,४९,४८४ करोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत.

राज्यात ८९९८ नवीन कोरोना रूग्ण, ६० रुग्णांचा मृत्यू
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांचा प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी राज्यात ८९९८ रुग्ण आढळले आहेत. तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला. ६१३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. आतापर्यंत एकूण २०,४९,४८४ करोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार  १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यात  सर्वाधिक १७ हजार ५२२ अॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. नागपूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजार ६६२ वर पोहचली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत आज १ हजार १०४ नवीन बाधितांची नोंद झाली असून सध्या एकूण ९ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार १४२ इतका झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा