Advertisement

आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला ‘ओमिक्रॉन’ कोरोनाची लागण?

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’ याची चर्चा सुरू आहे.

आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला ‘ओमिक्रॉन’ कोरोनाची लागण?
SHARES

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’ याची चर्चा सुरू आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळुन आला असून, तेथूनच डोंबिवलीत आलेल्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रवाशाला उपचारार्थ कल्याणमधील आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

सोमवारी त्याचा स्वॅब मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविला जाणार असून त्या अहवालानंतर त्याला लागण झालेला कोरोना नवा स्ट्रेनचा आहे का हे स्पष्ट होईल अशी माहीती केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

संबंधित प्रवाशी २४ नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला असून केपटाऊन, दुबई, दिल्ली, मुंबई असा त्याचा प्रवास झाला आहे. ज्यावेळी त्याचे विमान दिल्लीला उतरले तेव्हा केलेल्या चाचणीत त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. परंतु,  मुंबईला दाखल होताच त्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

केडीएमसीच्या  वैद्यकीय आरोग्य विभागाला याची माहीती कोरोना चाचणी केंद्रातून कळविण्यात आली. त्यावरुन कोरोना बाधित संबंधित व्यक्तीला तातडीने कल्याण लालचौकी येथील कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा