Advertisement

पालिकेनं उभारला मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

जम्बो ऑक्सिजन प्लांटचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

पालिकेनं उभारला मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, जाणून घ्या वैशिष्ट्ये
SHARES

माहुल इथं जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर निर्माण झालेल्या या ऑक्सिजन प्लांटचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

जम्बो ऑक्सिजन प्लांटची वैशिष्टे

  • माहुल, चेंबूर इथं पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला.
  • व्ही पी एस ए टेक्नॉलॉजी द्वारा ऑक्सिजन निर्मिती होणार.
  • भारत पेट्रोलियमनं एक आणि पालिकेनं दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसवली आहे.
  • प्रकल्पाचा खर्च अंदाजे १५ कोटी रुपये आहे.
  • १४ लिटरचा एक याप्रमाणे तासाला सुमारे ५० सिलेंडरची निर्मिती होणार.
  • दिवसाला सुमारे १५०० सिलेंडरचा पुरवठा केला जाणार.
  • पूर्व उपनगर आणि मेट्रो रिजनमधील रुग्णालयांना आणि कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार.

भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीट चं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेनं रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले. इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण आणि सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला, असं आदित्य म्हणाले.

कोरोना विरोधातील लढाईसाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सर्वतोपरी सज्ज आहे. माहुल इथल्या जम्बो प्लांटमुळे मुंबई उपनगर आणि आसपासच्या मेट्रो रिजन मधील वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी पूर्ण होऊ शकेल. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत उभारण्यात आलेल्या प्लांटसाठी भारत पेट्रोलियम आणि मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतो, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.हेही वाचा

'त्या' प्रवाशांना सक्तीचे गृहविलगीकरण आणि आरटीपीसीआर चाचणीतून सूट

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्यात मुंबई आघाडीवर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा