Advertisement

आता घर बसल्या करा कोरोना चाचणी, 'इतक्या' रुपयात किट उपलब्ध

हेल्थकेअरचे प्रमुख अ‍ॅबॉट यांनी सोमवारी ही माहिती दिली.

आता घर बसल्या करा कोरोना चाचणी, 'इतक्या' रुपयात किट उपलब्ध
SHARES

भारतातील वयस्क आणि लहान मुलांमध्ये लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या सार्स-सीओवी-2 विषाणूचा शोध घेण्यासाठी कोविड होम टेस्ट किट सुरू करण्यात आली आहे. हेल्थकेअरचे प्रमुख अ‍ॅबॉट यांनी सोमवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे हे किट अवघ्या ३२५ रुपयांत मिळणार आहे.

अ‍ॅबॉट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या कोट्यवधी Panbio COVID-19 जलद प्रतिजैविक चाचणी किट उपलब्ध करून देईल. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरील ओझे कमी होण्यास मदत होईल.

अ‍ॅबॉटच्या माहितीनुसार, या किटच्या सहाय्यानं कोविड 19 विषाणूची घरी सहज तपासणी केली जाऊ शकते. या चाचणी उपकरणासंदर्भात आयसीएमआरचे माजी महासंचालक निर्मल कुमार गांगुली म्हणाले की, यामुळे होम आयसोलेशन वेगवान होईल आणि योग्य वेळी विषाणूचा प्रसार थांबवला जाईल.

कंपनीचे एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष संजीव जोहर म्हणाले की, वेगवान अँटीजेन चाचणी कोरोनाविरुद्ध लढ्यात मदत करेल. जुलैअखेर पहिल्या टप्प्यात ७ मिलियन म्हणजेच ७० लाख चाचणी किट देण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. गरज आणि मागणी वाढल्यानं कंपनी लाखो चाचणी किट तयार करण्यास सक्षम आहे.

या टेस्ट किटचे नाव अ‍ॅबॉट Panbio COVID-19 अँटीजेन टेस्टिंग किट असं ठेवलं गेलंय. एकाच किटची किंमत ३२५ रुपये, ४ पॅक किटची किंमत १ हजार २५० रुपये, १० पॅक किटची किंमत २ हजार ८०० रुपये आणि २० पॅक किटची किंमत ५ हजार ४०० रुपये आहे.

अलीकडेच फ्रेंच कंपनीनं (PathStore) कोविड 19 आरटी-पीसीआर चाचणी २९९ रुपयांत सुरू केली. पाथस्टोअरनं निवेदनात म्हटलं होतं की, कंपनीची ही अत्यंत परवडणारी आरटी-पीसीआर चाचणी पर्यटन, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रातील कामकाजात मदत करेल.

पुढील एक ते तीन महिन्यांत पाथ स्टोअर सर्व कोविड 19 प्रभावित राज्यांमध्ये विस्तारित होईल. आरटी-पीसी आणि नमुने गोळा करण्यासाठी कंपनी २ हजारांहून अधिक वैद्यकीय प्रतिनिधी तैनात करेल. कंपनीनं गुरुग्राममध्ये एक मोठा आरटी-पीसीआर आणि बायोसॅफ्टी लेव्हल -३ चाचणी लॅब सुरू केलीय. येथे दिवसात एक लाख नमुने तपासले जाऊ शकतात.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा