Advertisement

जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा


जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा
SHARES

जोगेश्वरीतील ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार्‍या सुविधांमध्ये आता वाढ होणार आहे. यात हेमोडायलेसिस सेंटर, सीआर्म तसेच सोनोग्राफी मशिनबरोबरच वेंटिलेटरच्या सुविधेतही वाढ करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यासोबत सोमवारी चर्चा झाली.

ट्रॉमा केअर हॉस्पिटलमधील असुविधांबाबत हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक शशिकांत वाडेकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. यात सुधार समितीने 16 जुलै 2013 रोजी तसेच महापालिकेच्या 18 ऑक्टोबर 2013 च्या ठरावान्वये ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे संपूर्ण धर्मादाय तत्वावर हेमोडायलेसिस सुरू करण्याची मंजुरी दिली होती. परंतु आजतागायत डेमोडायलेसिस सेंटर सुरू न झाल्यानं राज्यमंत्री वायकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत हे केंद्र का सुरू झाले नाही? याचा आणि अन्य विषयांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी या विभागाचे उपआयुक्त सुनील धामणे यांनी येत्या 4 ते 5 महिन्यांमध्ये हेमोडायलेसिस केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं अाश्‍वासन राज्यमंत्री वायकर यांना दिलं.

ट्रॉमा केअर हॉस्पिटमलमध्ये 10 रुग्ण असलेले अतिदक्षता विभाग सुरू आहे. तेथे अतिरिक्त व्हेटिलेटर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी जनतेकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार सर्व मनपा हॉस्पिटलसाठी 400 व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ट्रॉमा हॉस्पिटलसाठी 40 अतिरिक्त व्हेटिलेटर देण्यात येणार असल्याची माहिती धामणे यांनी वायकर यांना दिली.

ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये सध्या 1 सीआर्म तसेच 1 सोनोग्राफी मशिन उपलब्ध आहेत. येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त 1 सीआर्म तसेच 1 सोनोग्राफी मशिनची गरज असल्याने येत्या 4 ते 5 महिन्यांमध्ये या दोन्ही मशिन पुरविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सुनील धामणे यांनी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा