Advertisement

कृषिमंत्री दादा भुसे कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कृषिमंत्री दादा भुसे कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावं असं आवाहन केलं आहे. त्यांची तब्येत ठीक आहे, घाबरून जाण्याची गरज नाही असं भुसे यांनी सांगितलं.

यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं होतं. सर्व मंत्री उपचारानंतर बरे झाले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदींचा समावेश आहे.



हेही वाचा

राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती; हा पैसा आला कुठून?- किरीट सोमय्या

ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा