Advertisement

राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती; हा पैसा आला कुठून?- किरीट सोमय्या


राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती; हा पैसा आला कुठून?- किरीट सोमय्या
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून संजय राऊत यांच्यावर साधला जात आहे.

'संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा', असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

“राऊत परिवार” माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे. एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. पीएमसीसाठी हे महत्वाचे आहे. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

'एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. एचडीआयएल आणि प्रवीण राऊत परिवाराचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक संबंध आहेत, व्यवहार आहेत. प्रवीण राऊत परिवार आणि संजय राऊत परिवाराचे पण आर्थिक व्यवहार व विशेष संबंध आहेत. 

संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा.” असं देखील सोमय्या ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा