Advertisement

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश

आरोग्य विभागाच्या चाचणीत घट झाल्याचं लक्षात आल्यानंतर हा आदेश देण्यात आला.

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरस (COVID-19) प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. असं असलं तरी केंद्र सरकारने नुकत्याच पाठवलेल्या संप्रेषणात, काही राज्य सरकारांना COVID-19 चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या चाचणीत घट झाल्याचं लक्षात आल्यानंतर हा आदेश देण्यात आला.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हा संदेश संबंधित आरोग्य विभागांना दिला आहे. राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांना त्याचा पाठपुरावा करून त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंदाजित तिसरी कोविड लाट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा आरोग्य तज्ञांच्या मते, १८ वर्षांखालील मुलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय, अनेक राज्यांनी कोविड प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली आहे. यावर नियंत्रण न केल्यास सरकारची चिंता वाढू शकते.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही सतर्क आहोत. १४ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि राज्याचा साप्ताहिक सकारात्मकता दर १ टक्के आहे. मी सर्व जिल्ह्यांना पुढील चाचणीसाठी सूचित केलं आहे."

सरकारनं असेही निर्देश दिले आहेत की, सण आणि सुट्टीच्या काळात अनेक नागरिकांनी देशभरात आणि परदेशात प्रवास केल्यामुळे चाचणीवर भर देण्याची गरज आहे. शिवाय, विवाह, सार्वजनिक कार्यक्रम इ. पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या आधी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सतत दक्षता घेणं आवश्यक आहे. चाचणीमध्ये निष्काळजीपणा केल्यास संसर्ग पसरू शकतो.

आत्तापर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात ६.४ कोटी पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी केवळ ११ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत आणि उर्वरित ८९ टक्के निगेटिव्ह आहेत.

सरकारही कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करत आहे. अहवालानुसार, अनेक नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेणं टाळलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि योग्य संदेश देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

औरंगाबाद प्रशासनानं ऑटोचालकांना कोविड-19 ची लसीकरण न केल्यास वाहने जप्त करण्याचा इशारा दिला आहे. वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. कारण त्यामुळे अनेक नागरिक दैनंदिन प्रवासासाठी ऑटोरिक्षा वापरत आहेत. याद्वारे प्रसार होण्याचा धोका अधिक आहे.हेही वाचा

मुंबईतील ७०% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण

फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा पालिकेचा प्रस्ताव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा