Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू होणार

कोव्हिशील्ड लस उपलब्ध झाली असली तरी कोव्हॅक्सिनचा साठा मात्र मर्यादित आहे. यामुळे ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू होणार
SHARES

मुंबईत कोविशिल्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सोमवारी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. कोव्हिशील्ड लस उपलब्ध झाली असली तरी कोव्हॅक्सिनचा साठा मात्र मर्यादित आहे. यामुळे ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे.

कोरोना लसीच्या १ लाख ५८ हजार मात्रा मुंबई महापालिकेला रविवारी प्राप्त झाल्या आहेत. शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आलं आहे. यामुळे सोमवार दिनांक २६ ते बुधवार दिनांक २८ एप्रिल  असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान,  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुंबईत ७ खासगी रुग्णालये, ३० सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रे अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु असल्याची माहिती दिली. लोकांनी आधी चौकशी करावी आणि मगच लस घेण्यासाठी जावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबईत लसींचा साठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे. आधी चौकशी करुन लसीकरण केंद्रावर गेल्यास लोकांची गैरसोय आणि धावपळ होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईतील मित्तल रुग्णालय, क्रिटिकेअर रुग्णालय, तुंगा रुग्णालय, लाईफलाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, शिवम रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून जेजे रुग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, एसएआयएस रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, कूपर रुग्णालय, टोपीवाला रुग्णालय, गोकुळधाम प्रसुतीगृह, मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सखापाटील रुग्णालय, मालवणी सरकारी रुग्णालय, चोक्सी प्रसूतीगृह, आप्पापाडा प्रसूती रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, शताब्दी रुग्णालय अशा सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.हेही वाचा -

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा