Advertisement

स्टेण्टची कृत्रिम टंचाई?


स्टेण्टची कृत्रिम टंचाई?
SHARES

मुंबई - रुग्णालय, डॉक्टर आणि स्टेण्ट निर्मिती कंपन्यांकडून सुरू असलेली रूग्णांची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने स्टेण्टच्या किंमती नियंत्रणात आणल्याने रूग्णालय, डॉक्टर आणि कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. स्टेण्ट निर्मितीतील अबोट कंपनीसह अन्य कंपन्यांनी स्टेण्टचा पुरवठाच बंद केला आहे. तर स्टेण्टची कृत्रिम टंचाई कंपन्यांनी निर्माण केली आहे. परिणामी अनेक अॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात येत असल्याचे समजते आहे.

चार महिन्यांपूर्वीच सरकारने फेब्रुवारीमध्ये स्टेण्टच्या नव्या किंमती लागू होतील, असे जाहीर केले. त्यानुसार कंपन्यांनी रिलेबल करत नव्या किंमतीतील स्टेण्ट फेब्रुवारीपासून उपलब्ध करुन देणे गरेजेचे होते. पण हे न झाल्याने स्टेण्टचा कृत्रिम तुटवडा कंपन्यांनी आणि रूग्णालयांनी निर्माण केल्याचा आरोप आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते उमेश खके यांनी केला आहे. तर आता त्वरीत स्टेण्टचा मुबलक पुरवठा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय सुरसे यांनी स्टेण्टच्या तुटवड्यामुळे मोठा दुष्परिमाण होत असल्याची माहिती मुंबई लाइव्हला दिली आहे. गेल्या चार दिवसांत मोठ्या संख्येने अॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आल्या असून ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर याचा फटका रूग्णांना बसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या सह आयुक्त (औषध) बृहन्मुंबई विनिता थॉमस यांनी ही कृत्रिम टंचाई असल्याचं सांगितलं आहे. तर एफडीएचे अधिकारी रूग्णालयांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. रिलेबलिंगसाठी वेळ हवा म्हणून कंपन्यांनी स्टेण्टचा पुरवठा थांबवला आहे. पण रिलेबलिंगशिवाय नव्या किंमतीत स्टेण्ट उपलब्ध करून देण्याचा पर्याय कंपन्यांसाठी दिला आहे. त्यामुळे ही परिस्थिती लवकरच सुधारेल. तर ही कृत्रिम टंचाई दूर करण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

डॉक्टर-रूग्णालयांकडून रूग्णांची दिशाभूल

जेनेरिक औषधांचा दर्जा चांगला नसतो, असं म्हणत डॉक्टर-रूग्णालय-कंपन्यांचे त्रिकुट ज्याप्रमाणे जेनेरिक औषधांबाबत अपप्रचार करते, तेच स्टेण्टबाबतही सुरू असल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे. कमी किंमतीच्या स्टेण्टचा दर्जा चांगला नसतो, देशात तयार होणारे स्टेण्ट हलक्या प्रतीचे असते असा अपप्रचार रूग्णांमध्ये करत रूग्णांची दिशाभूल करत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे हा अपप्रचार त्वरीत थांबण्याची मागणीही तज्ज्ञांकडून होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा