दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !

Thane
दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !
दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !
दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !
दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !
दोन महिन्यात 20 किलो वजन घटवलं !
See all
मुंबई  -  

मुंबई - स्थूल शरीराचा अनेकांमध्ये न्यूनगंड असतो. पण, काही व्यक्ती लठ्ठ शरीराचा न्यूनगंड न बाळगता त्यावर उपाय शोधतात, ते अमलात आणतात आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करतात. आशू चेतन ठक्कर या महिलेचा अशाच व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करावा लागेल. सामान्य गृहिणी ते चँपियन असा आशूचा चमकदार आणि प्रेरक प्रवास आहे.   38 वर्षाची आशू ठक्कर ही एक गृहिणी असून 2014 मध्ये तिचं वजन 85 किलो एवढे होते. पण, दररोज व्यायाम, सकस आहार घेऊन तिने आपलं वजन दोन महिन्यात 20 किलो एवढं कमी केलं. त्यानंतर ती मार्शल आर्ट शिकली. 

एवढ्यावरच न थांबता तिने दिल्लीत होणाऱ्या मार्शल आर्ट नॅशनल जिऊ जित्सू चॅम्पियनशिप 2017 मध्ये खेळायची इच्छा कोच मायकल परेरा यांच्याकडे व्यक्त केली. कोच परेरा यांनी आशुला या स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिलं. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये 27, 28 आणि 29 मार्चला झालेल्या मार्शल आर्ट नॅशनल जिऊ जित्सू चॅम्पियनशिप 2017 या स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. आशूचा सामना जवळपास 7 वर्ष अनुभव असलेल्या आणि सुवर्णपदक पटकावलेल्या विजेती चंदीगडच्या प्रिया शर्मा हीच्याशी झाला. पण आशूने तिच्यावर मात करत 1 रौप्यपदक आणि 1 कांस्यपदक पटकावलं.

आता आशूचं वजन 62 किलो एवढं आहे. अजूनही वजन कमी करण्याचा तिचा मानस आहे. तर, योग्य आहार आणि दररोज व्यायाम करून आपण नक्की वजन कमी करू शकतो, असा विश्वास आशूने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केला. भविष्यात कांस्यपदक आणि रौप्यपदकावरच न थांबता सुवर्णपदक मिळवण्याचा आशू ठक्करचा मानस आहे.

या स्पर्धेत देशातून जवळपास 1 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ठाण्यातील एम. एम. वॉरिअर्स या संस्थेतर्फे आणि कोच मायकल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेसाठी आशूने केलेल्या तीन महिन्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं आहे. आशूच्या या प्रयत्नांसाठी तिच्या कुटुंबियांनीही तिला खूप मदत केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.