Advertisement

भांडूपमध्ये आयुर्वेदीक कॅन्सर रुग्णालयाची घोषणा


भांडूपमध्ये आयुर्वेदीक कॅन्सर रुग्णालयाची घोषणा
SHARES

भांडूप - भांडूपमध्ये केंद्र सरकाच्या आयुष मंत्रालयांतर्गत आत्याधुनिक आयुर्वेदीक कॅन्सर रुग्णालय, रिसर्च सेंटर उभारणार असल्याची माहिती आयुषचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेची पाहणी केल्यानंतर हे रुग्णालय तसेच रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भांडुप पूर्वेजवळील खार विभागाच्या जमिनीवर सुमारे ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला केंद्रानं मंजुरी दिलीय. रुग्णालयासाठी २.७८० एकर जागा देण्यात आली असून, ४,८७,००० स्क्वेअर फूट जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा, सुविधांसह सुसज्ज भांडुप पूर्वेजवळील खार विभागाच्या जमिनीवर सुमारे ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली आहे. अत्याधुनिक सेवा, सुविधांसह सुसज्ज यंत्रणांनी असलेले हे रुग्णालय राज्यातील एक आदर्श असं कॅन्सर रुग्णालय ठरेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. या रुग्णालयासाठी आंतरबाह्य रुग्णांसाठी 300 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, 500 बाह्यरुग्ण येथील सेंटरमधून सेवा घेऊ शकणार आहेत. २०१७-१८ पासून हॉस्पिटलच्या उभारणीस सुरूवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्र सरकारच्या सीपीडब्ल्यूडी विभागाची ही जागा सोमय्या यांच्या विनंतीनंतर कॅन्सर रुग्णालयासाठी आयुष मंत्रालयाच्या नावावर करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा