Advertisement

म्युकरमायकोसिसमुळं मुंबईत ३ लहान मुलांचे डोळे काढावे लागले

राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराचे संकट आता अधिक वाढत चालले आहे.

म्युकरमायकोसिसमुळं मुंबईत ३ लहान मुलांचे डोळे काढावे लागले
SHARES

राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराचे संकट आता अधिक वाढत चालले आहे. कारण काही दिवसांपूर्वी मोठ्या वयोगटातील लोकांपुरता मर्यादित असलेल्या म्युकरमायकोसिसने (Mucormycosis) आता लहान मुलांनाही आपल्या जाळ्यात ओढत आहे. मुंबईत म्युकरसमायकोसिसमुळं नुकतीच ३ लहान मुलांचे डोळे काढण्याची वेळ ओढावली.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुलांचे वय अनुक्रमे ४, ६ आणि १४ इतके होते. या तिघांच्या शरीरात म्युकरमायकोसिसचा फैलाव झाल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले. या तिघांपैकी केवळ १४ वर्षांच्या मुलाला मधुमेहाचा त्रास होता. तर मुंबईत उपचार घेत असलेल्या आणखी एका १६ वर्षांच्या मुलाला कोविडमधून बरे झाल्यानंतर मधुमेहाची व्याधी जडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मुंबईतील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो. अशातच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

शिवाय, डॉक्टरांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. १६ वर्षांच्या मुलीला कोरोना झाल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अगोदरपासून मधूमेह नव्हता. मात्र, वैद्यकीय तपासणीत तिच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून आले. तिच्या आतड्यात रक्तस्राव होत होता. अँजिओग्राफी केल्यानंतर या मुलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

म्युकरमायकोसिसची बाधा होऊन त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर या मुलांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना नाईलाजाने त्यांचे डोळे काढण्याचा निर्णय घ्यावा लागला.



हेही वाचा - 

CBSE 10th result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

  1. CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा