Advertisement

CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत

बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाणार आहे.

CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चा १२ वीचा निकाल (12th result) ३१ जुलैच्या आत लागणार आहे. १२ वी निकाल प्रकरणी नियुक्त केलेल्या १३ सदस्यीय समितीनं गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये १२ वीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगण्यात आला आहे. बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाणार आहे. 

निकालासाठी ३०:३०:४० क्रायटेरिया लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीतले गुण बारावीच्या निकालासाठी विचारात घेतले जाणार आहेत.  बारावीचा निकाल ३१ जुलै २०२१ पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली. 

केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालात खंडपीठासमोर सीबीएसई बोर्डाच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पद्धतीचे निकष सादर केले. यानुसार, दहावीच्या ५ विषयांपैकी ३ विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील. तसंच अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीच्या गुणातील ३० टक्के आणि १२ वी च्या ४० टक्के गुणांवर आधारित निकाल लावण्यात येईल.

निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत निकाल समिती स्थापन करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला अनावश्यक वाढीव गुण मिळणार नाहीत, याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. तसंच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. 

न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने गुरुवारी या याचिकांवर सुनावणी घेतली. ज्या राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तेथील ज्या विद्यार्थ्यांना बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)प्रवेशाच्या फॉर्म्युलासाठी समिती नेमावी, तसेच जेथे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, त्या राज्यांना तसे निर्देश द्यावेत, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा - 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा