माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे.

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू
SHARES

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) ताब्यात घेण्यात आलं आहे. यासोबतच प्रदिप शर्मा यांच्या घरी NIAनं छापे टाकले आहेत.

सकाळी ६.३० च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आली. एनआयए प्रदीप शर्मा आणि निलंबित API सचिन वझे (Sachin Vaze) आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे (Vinayak Shinde) यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) कार मायकल रोडवर (mumbai carmichael road) स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. त्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना अटक केली. एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या चौकशीतून काही माहिती समोर आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शिवसेनेच्या तिकीटावर निवडमूक लढलेले प्रदीप शर्मा ठाण्यातील अँटी एक्सटॉर्शन सेलमध्ये कार्यरत होते. ९० च्या दशकात त्यांना मुंबई क्राइम ब्रांचमध्ये सामील करण्यात आले होते. त्या टीमला मुंबई अंडरवर्ल्डचा खात्मा करण्याची जबाबदारी दिली होती. तेव्हापासूनच शर्मांची एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख झाली.

उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेले आणि नंतर धुळ्यात वाढेलल्या प्रदीप शर्मांनी ३५ वर्षे पोलिस विभागात सेवा केली. यादरम्यान त्यांनी ११२ एनकाउंटर केले. १०० पेक्षा जास्त एनकाउंटर करणारे ते देशातील पहिले पोलिस अधिकारी आहेत. २०१९ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती.



हेही वाचा

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा स्वत:च्या दोन मुलांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

केक आणि पेस्ट्रीजमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीचा बेकरीवर छापा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा