केक आणि पेस्ट्रीजमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीचा बेकरीवर छापा

एनसीबीने या प्रकरणी एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नसून या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.

केक आणि पेस्ट्रीजमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीचा बेकरीवर छापा
SHARES

ड्रग्स (drugs) ची विविध माध्यमातून तस्करी (Smuggling) होत असल्याचं आपण एेकलं आहे. मात्र, आता चक्क बेकरीच्या प्रोडक्ट्समधून ( bakery products) ड्रग्स विकलं जात असल्याचं समोर आलं आहे. बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक (cakes) आणि पेस्ट्रीज (pastries) मधून ड्रग्सची विक्री केली जात होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी - ncb) मालाड (malad) मधील एका बेकरीत छापा टाकून ही तस्करी उघडकीस आणली आहे. 

बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून पुरवठा होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई (mumbai) तील मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकला. घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे

एनसीबीने या प्रकरणी एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नसून या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेला ड्रग्ज अँगल आणि त्यानंतर एनसीबीची सुरू असलेली कारवाई ही अद्यापही सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कारवाया करत तस्करांना गजाआड केलं आहे.



हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा