निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा स्वत:च्या दोन मुलांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील बायको आणि मुलांबरोबर भांडण करत असल्याने त्यांना सर्वजण कंटाळले होते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती.

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा स्वत:च्या दोन मुलांवर गोळीबार, एकाचा मृत्यू
SHARES

एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने (retired police officer) आपल्या मुलांवरच (son) गोळीबार (shoots) केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबई (navi mumbai) तील ऐरोली (airoli) मध्ये घडली आहे. यामध्ये एका मुलाचा मृत्यू (death) झाला. तर दुसरा मुलगा जखमी आहे. 

ऐरोलीत राहाणाऱ्या भगवान पाटील (Bhagwan Patil) या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. या गोळीबारात विजय पाटील (३५) आणि सुजय पाटील (३३) हे दोघे जखमी झाले. तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी भगवान पाटील यांना ताब्यात घेतलं आहे.

ऐरोली सेक्टर २ मध्ये भगवान पाटील राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील बायको आणि मुलांबरोबर भांडण करत असल्याने त्यांना सर्वजण कंटाळले होते.  त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती.

विजय पाटील वसईला राहतो. तुला गिफ्ट द्यायचंय असं सांगून भगवान पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी विजयला घरी बोलावून घेतलं. विजय  घरी आल्यावर त्याच्यावर भगवान पाटील यांनी गोळ्या झाडल्या. तसंच त्यांचा दुसरा मुलगा सुजय पाटील याच्यावरही गोळीबार करण्यात आला. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली.  

विजयला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातून बाहेर येताच तो रस्त्यावर पडल्याने त्याला ऐरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

 भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचं कृत्य केलं आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्व्हर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या. 



हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा