१०० कोटी खर्च केले, तरीही डॉक्टरांवर हल्ले सुरुच

  BMC
  १०० कोटी खर्च केले, तरीही डॉक्टरांवर हल्ले सुरुच
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयातील खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा काढून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. परंतु आतापर्यंत प्रमुख रुग्णालय आणि इतर ठिकाणी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येत होते. यासर्व ठिकाणी पुरवण्यात आलेल्या या खासगी सुरक्षेसाठी दीड वर्षात या कंपनीवर सुमारे शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शंभर कोटी खर्च करूनही डॉक्टरांवर हल्ले होणं मात्र थांबलं नसल्याचंही सिद्ध झालं आहे.

  मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांना मारहाण झाल्यामुळे महापालिकेच्या वतीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्व खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा काढून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ४०० जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत केईएम, शीव, नायर, कुपर आदी प्रमुख रुग्णालयांसह तळोजा डम्पिंग ग्राऊंड, ट्रॅफिक वॉर्डन, देवनार डम्पिंग ग्राऊंड, नाना चौक, के/पश्चिम घनकचरा कार्यालय, गोरेगाव  किटकनाशक, अमिझरा बिल्डींग, इंडिया युनायटेड मिल्स इंदू मिल्स आदी ठिकाणी ३०९ खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यात आली होती. सर्व ठिकाणी विविध कालावधींसाठी सुरक्षा सेवा घेण्यात आली होती. मे २०१५ पासून रुग्णालयांमध्ये २० महिन्यांची सेवा, तर काही ठिकाणी एक वर्ष, तर तीन ते नऊ महिने अशाप्रकारे विविध कालावधींसाठी खासगी सेवा घेण्यात आली होती. या सर्व ठिकाणी ९४ कोटी ४१ लाख ३७ हजार ४४ रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. परंतु यामध्ये आणखी ४ कोटी २६ लाख ६३ हजार ७९४ कोटी रुपयांचे कंत्राट वाढवून देत एकूण ९८ कोटी ६८ लाख ८३८ रुपयांचे कंत्राट ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनेल सर्विसेस या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या कंपनीचे कंत्राट आता संपुष्टात आले असून या साडेचार कोटींच्या वाढीव खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे मंजुरीला आहे.

  सरकारी सुरक्षेसाठी वर्षाला ११ कोटींचा खर्च

  महपालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांतील रिक्त जागी तसेच खासगी सुरक्षा व्यवस्था बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे सुरक्षा रक्षक १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी ४൦൦ सुरक्षा रक्षकांना नेमले आहे. या ४൦൦ सुरक्षा रक्षकांवर ९५ लाख ०९ हजार ३५० मासिक खर्च होणार आहे. तर एक वर्षासाठी ११ कोटी ४१ लाख १२ हजार २०० एवढ्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता  दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.