Advertisement

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट? महापालिका आयुक्त म्हणाले...

मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट? महापालिका आयुक्त म्हणाले...
SHARES

मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, कोरोनाच्या चाचणीचं प्रमाण वाढविण्यात आलं आहे. त्यामुळं दिवसाला रुग्णांची संख्या वाढत असून, अद्याप मुंबईत करोनाची दुसरी लाट आली नसल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. चाचणीचं प्रमाण वाढवलं असल्यानेच रुग्णसंख्या वाढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच महापालिकेने जीम आणि रेस्तराँ मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांनी परवानगी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे.

गुरुवारी मुंबईत २१६३ नव्या रोना रुग्णांची तर ५४ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट अजिबात आलेली नाही हे पुन्हा एकदा सांगायचं असल्याचं इक्बल चहल यांनी एक कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. मुंबईत आधीच्या ७ हजारांच्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेने जाणीवपूर्वक चाचणी दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते याची खात्री होती. याआधी दिवसाला ७ हजार चाचण्यांमागे ११०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २००० इतकी झाली असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली.

महापालिका दिवसाला २० हजार चाचण्या करण्याची योजना आखत आहे. चाचण्यांची संख्या दिवसाला ३२ हजार इतकी केली तर यामुळे एका दिवसाची रुग्णसंख्या चार हजारांपर्यंत जाईल. पण आपली आरोग्य यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे, असंही इक्बाल चहल यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा