Advertisement

महालक्ष्मी रेसकोर्स, विज्ञान केंद्र, निसर्गोद्यानात क्वारंटाईन सेंटर उभारणार

मुंबईत कोरोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा रुग्णांसाठी आणखी खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स, विज्ञान केंद्र, निसर्गोद्यानात क्वारंटाईन सेंटर उभारणार
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिका महालक्ष्मी येथील रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, माहीम निसर्गोद्यान, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानामध्ये क्वारंटाईन सेंटर उभारणार आहे. या ठिकाणी तब्बल २० हजार खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्यांची या केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.  अशा रुग्णांसाठी आणखी खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गोद्यान, गोरेगावचे नेस्को मैदान येथे व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी २० हजार खाटा असतील.

कोरोनाची तीव्र स्वरुपाची बाधा झालेल्या रुग्णांसाठी नायर, केईएम, सेव्हन हिल्स या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या अशा रुग्णांसाठी तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता आणखी १७५० खाटा उपलब्ध करण्यात येत असून अशा रुग्णांसाठीच्या खाटांची क्षमता ४,७५० इतकी होणार आहे.हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा