Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

मुंबईकरांसाठी परदेशातून लस मागवण्यासंदर्भात विचार सुरू, आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवर दिली.

मुंबईकरांसाठी परदेशातून लस मागवण्यासंदर्भात विचार सुरू, आदित्य ठाकरेंची माहिती
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होतोय. आता लवकरच या समस्येतून मार्ग निघणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवर दिली.

मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगानं शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. तशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. शहरातील लसीकरण वेगानं आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसंच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी. याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्र वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे.

यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी झाल्यानं आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असंही ते म्हणाले.

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबवण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेनं जारी केल्या आहेत, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीनं त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.हेही वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळेच हे शक्य, इक्बाल सिंह चहल यांचं मोठं विधान

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा