Advertisement

आधार कार्ड नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा

नुकतच राजावाडी रुग्णालयात एका गर्भवतीकडे नवऱ्याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकरल्याची घटना घडली.

आधार कार्ड नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा
SHARES

आधार कार्ड (Aadhar card ) नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास  कारवाई केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने आरोग्य अधिकाऱ्यांना तसा इशारा दिला आहे.

नुकतच राजावाडी रुग्णालयात एका गर्भवतीकडे नवऱ्याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकरल्याची घटना घडली. या घटनेनंतर अनेक सामाजीक आणि रुग्णमित्र संस्थांनी याबाबत तक्रार करत विरोध केला.  मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागाला आधारकार्ड नसल्यास कोणत्याही गर्भवतीला आरोग्य सुविधा न देता परत पाठवू नका, असे आदेश दिले आहेत.

नाल्याची सफाई करत असताना गर्भवती महिला खड्ड्यात  पडली. त्यानंतर जखमी महिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यावेळी तिच्याकडे आधारकार्ड नसल्याने तिला घरी पाठविण्यात आले. एवढच नाही तर महिला अगोदर शताब्दी रुग्णालयात गेली होती. तेथेही तिला उपचार नाकारला होता.

या घटनेची दखल आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी घेतली. आधारकार्ड नसलेल्या कोणत्याही गर्भवती महिलेला आरोग्य सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे  गोमारे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला मोफत आरोग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना' (Ayushman Bharat Yojana) राबवण्यात येत आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेअंतर्गत सरकारकडून जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात.  कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. 

आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana News) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं.


हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा