Advertisement

२ लसी, १ अँटीव्हायरल औषधाला आपत्कालीन वापराची परवानगी

विषय तज्ञ समितीनं (SEC) केंद्राकडे आपत्कालीन वापर करण्याची परवानगी देण्याची शिफारस केली होती.

२ लसी, १ अँटीव्हायरल औषधाला आपत्कालीन वापराची परवानगी
(Representational Image)
SHARES

मंगळवार, २८ डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, केंद्रानं प्रचलित, कोविड-१९ साथीच्या आजाराशी लढण्यासाठी दोन लसी आणि अँटीव्हायरल औषधांना आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आणि आरोग्य मंत्रालयानं CORBEVAX लस, COVOVAX लस आणि अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरसाठी एका दिवसात तीन मंजूरी दिलायीच माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. आणीबाणीच्या परिस्थितीत मर्यादित वापरासाठी परवानगी दिल्याचं त्यांनी म्हटलं.

वृत्तानुसार, CDSCO च्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीनं (SEC) केंद्राकडे आपत्कालीन वापर करण्याची परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्याच्या एक दिवसानंतर ही मंजुरी मिळाली आहे. कोवोवॅक्स हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे बनवले जाईल, तर कॉर्बेवॅक्स बायोलॉजिकल-ईद्वारे बनवले जाईल.

मांडविया यांनी म्हटलं की, Corbevax ही कोरोना विरूद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे.

याव्यतिरिक्त, देशातील १३ कंपन्या मर्कची कोविड-19 गोळी मोलनुपिरावीर तयार करतील. प्रौढ आणि रोगाच्या प्रगतीचा उच्च धोका असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.

यासह, ८ लसींना आपत्कालीन वापरासाठी अधिकृतता मिळाली आहे. ३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तसंच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना १० जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे.हेही वाचा

लहान मुलांच्या लसीकरणासाठी Cowin अॅपवर 'अशी' करा नोंदणी

१०० टक्के लसीकरण २६ जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा