Advertisement

लहान मुलांच्या लसीकरणासाठी Cowin अॅपवर 'अशी' करा नोंदणी

देशभरात येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी Cowin अॅपवर 'अशी' करा नोंदणी
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एक जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार, सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. अशातच आता बहुप्रतिक्षीत असलेल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. देशभरात येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी Cowin अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतंही ओळखपत्र सद्यस्थितीत उपलब्ध नाहीत.

नोंदणी प्रक्रिया

  • सर्व प्रथम Covin App वर जा. तुमचा मोबाइल क्रमांक टाका. 
  • ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन होईल.
  • आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. 
  • त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.
  • सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका.
  • लसीकरण केंद्रांची यादी येईल.
  • आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. 
  • केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
  • लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सिक्रेट कोड द्यावा लागेल. जो नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.
  • त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून तुमच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

देशाच्या औषध नियंत्रकाने १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीला मंजुरी दिली आहे. पण सरकारने केवळ १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात १५-१८ वर्षे दरम्यान १० कोटी मुले आहेत. या मुलांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. मुलांच्या लसीकरणाची मागणी देशात खूप दिवसांपासून केली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा