Advertisement

ध्यास मोतीबिंदू मुक्त‌ महाराष्ट्राचा!


ध्यास मोतीबिंदू मुक्त‌ महाराष्ट्राचा!
SHARES

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, औषधी द्रव्य विभाग आणि सार्वजनिक विभाग यांच्या सहकार्याने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यभरात विविध 15 ठिकाणी शिबीर भरवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र' या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.

ग्रामीण भागातील अनेकदा गरीब रुग्ण पैसे नसल्याने शस्त्रक्रिया करुन घेत नाहीत. ही संख्या १७ लाखांपर्यंत आहे. हे खरंतर नेत्रशल्यचिकित्सकांसाठी आवाहन आहे, की १५ ऑगस्ट २൦१९ पर्यंत आपल्याला महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आतापासून कामाला लागलं पाहिजे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आतापर्यंत महाराष्ट्रात या कार्यक्रमाअंतर्गत १ लाख २८ हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, येत्या १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत १७ लाख शस्त्रक्रिया करण्याचं आवाहन महाराष्ट्रातील अनेक भागातील नेत्रशल्यचिकित्सकांनी स्विकारलं आहे.

महाराष्ट्रात अंधत्वाचं प्रमाण 1.4 टक्के आहे. मोतीबिंदू रुग्णांच्या संख्येवरून महाराष्ट्रात मोतीबिंदूचा बॅकलॉग 17 लाख आहे. यातील 5 लाख रुग्णांचे मोतीबिंदू पिकलेले होते. तर 50 हजार रुग्णांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू असल्याची शक्यता आहे.

डॉ. तात्याराव लहाने, नेत्रतज्ज्ञ

शस्त्रक्रियेनंतर दुसरा दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे नेत्रतज्ज्ञांनी रुग्णांची योग्य पद्धतीने तपासणी करावी. खासगी रुग्णालय आणि नर्सिग होम मधील डॉक्टरांनी वर्षाला 50,000 शस्त्रक्रिया मोफत करुन द्याव्यात आणि या अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा