Advertisement

१५ ते १८वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा-कॉलेजमध्ये व्हॅक्सिनेशन कॅम्प सुरू

मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने थेट २० हजारांचा टप्पा गाठल्यानं महापालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

१५ ते १८वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा-कॉलेजमध्ये व्हॅक्सिनेशन कॅम्प सुरू
SHARES

मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने थेट २० हजारांचा टप्पा गाठल्यानं महापालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत १५ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा-कॉलेजमध्येही व्हॅक्सिनेशन कॅम्प सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण पालिका प्रशासनानं घेतला आहे. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

मुंबईत या वयोगटातील ९ लाख लाभार्थी मुले आहेत. ३ जानेवारी रोजी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर १२ जानेवारीपर्यंत १ लाख ८३८० मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.

सद्यस्थितीत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांनाही लागण होत असल्याचे समोर आले असले तरी लसीकरण पूर्ण झाल्यामुळे तीव्र लक्षणे आणि मृत्यू होत नसल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र लसीचा एकही डोस घेतला नसलेल्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजनची गरज लागत आहे.

शिवाय तिसऱ्या लाटेतील मृत्यूंमध्ये 94 टक्के मृत्यू लस न घेतलेल्या रुग्णांचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन एका महिन्यात पात्र लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १८ वर्षांवरील पात्र ९२ लाख लाभार्थी आणि इतर ठिकाणाहून मुंबईत आलेल्या नागरिक असे मिळून १०८ टक्के लसीकरण तर एकूण ९० टक्यांवर दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

मुंबईत सद्यस्थितीत ४६१ व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू आहे. तर ९ जम्बो सेंटर आणि रेल्वेच्या एका सेंटरवर मुलांसाठी लसीकरण सुरू आहे. मुलांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येत आहे. एका महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.

मुलांसाठी लसीकरण सेंटर वाढवण्यासाठी सकाळी कोव्हॅक्सिन आणि संध्याकाळी कोव्हिशिल्ड डोस, सेंटरवर एक ते दोन बूथ मुलांसाठी राखीव असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा