Advertisement

Coronavirus : मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ९०३ नवे रुग्ण, ३६ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७७ हजार १९७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ६२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus :  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ९०३ नवे रुग्ण, ३६ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES
Advertisement

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २४५ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ९०३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Marathi compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३६ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७७ हजार १९७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ६२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४४ हजार १७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल

राज्यात आज कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी  १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार  ३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.  मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

संबंधित विषय
Advertisement