Advertisement

Coronavirus Pandemic : परदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मुंबईत 88 हाँटेल्स राखीव


Coronavirus Pandemic : परदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मुंबईत 88 हाँटेल्स राखीव
SHARES
जगभरात कोरोना या महामारीने हाहाकार पसरवला आहे. अशा परिस्थितीत परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारने शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून पालिकेने परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारन्टाइन करण्यासाठी शहरातील तब्बल 88 खासगी हाँटेलं राखीव ठेवली आहेत. या राखीव हाँटेलमध्ये एकूण  3343 जणांना क्वारन्टाइन करून ठेवणे शक्य होणार आहे.

लॉकडाउनमुळे  जगभरात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. या हजारो रुग्णांना भारतात आणल्यानंतर त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्या पाहणीसाठी केंद्राचे एक पथक ही गुरूवारी मुंबईत आले होते. मुंबई बाहेरील प्रवाश्यांना तपासणी करून त्यांच्या मूळ गावी पोहचवले जाणार आहे. तर मुंबईतील  नागरिकांना 14 दिवस या हाँटेलमध्येच क्वारंटाइनमध्ये ठेवले जाईल.  7 मेपासून ब्रिटन, अमेरिका, बांग्लादेश, फिलिपिन्स, सिंगापूर आणि मलेशिया येथील 14 हजार 800 भारतीयांना परत आणले जाण्याची शक्यता आहे, असे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे.

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणताना सोशल डिस्टंसिंगचेही कठोरपणे पालन केले जाईल आणि या विशेष उड्डाणांमध्ये केवळ 200 ते 300 प्रवाशांना बसण्याची परवानगी असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाने भारताबाहेर जाण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत चालविलेल्या फ्लाइटवर प्रवाशांचे बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, 64  विशेष विमानांपैकी युएई मध्ये 10, कतार मध्ये 2 सौदी अरेबिया मध्ये 5, युके मध्ये 7, सिंगापूरमध्ये 5,  अमेरिकेमध्ये 7, फिलिपाईंसमध्ये 5, बांग्लादेशमध्ये 7, बहरिनमध्ये 2, मलेशियामध्ये 7, कुवेतमध्ये 5,ओमानमध्ये 2 विशेष विमानं परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी  पाठवली जाणार आहेत.


 
मुंबईत परत आलेल्या भारतीयांची तपासणी करून त्यांना या हाँटेलमध्ये क्वारंटाइन केले जाईल,  तर वैद्यकिय अहवाल पाँझिटिव्ह आलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येईल.हॉटेल्समध्ये 14 दिवसानंतर कोरोना संक्रमित नसल्याचे आढळून आल्यावर प्रवाश्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येईल.

विजय खबाले पाटील, पालिका प्रवक्ते  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा