Advertisement

कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात आढळले 1233 नवे रुग्ण, 48 तासात 68 जणांचा मृत्यू


कोरोनाचा हाहाकार ! एका दिवसात आढळले 1233 नवे रुग्ण, 48 तासात 68 जणांचा मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात  बुधवारी कोरोनाचे 1233 नवे रुग्ण आढळून आले आहे. 257 जणांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 13 हजार 322 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  बुधवारी कोरोना या महामारीने 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख  90 हजार 879 नमुन्यांपैकी  1 लाख 73 हजार  838 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  16 हजार 758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख  11 हजार 112  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसात 68 जणांचा महामारीने  बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 651 इतकी झाली आहे.

बुधवारी मृत पावलेल्या 34 नागरिकांमध्ये मुंबईतील 25 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 3, जळगाव 1, सोलापूर  1 व्यक्तीचा समावेश आहे. बुधवारी झालेल्या 34 मृत्यूमध्ये 21 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 18 रुग्ण आहेत तर 13 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 34 मृतांपैकी 27 जणांमध्ये (79 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा