Advertisement

coronavirus update: महाराष्ट्रात २ लाखांहून जास्त कोविड-१९ चाचण्या

राज्यात आजपर्यंत तब्बल २ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारं राज्य ठरलं आहे.

coronavirus update: महाराष्ट्रात २ लाखांहून जास्त कोविड-१९ चाचण्या
SHARES

राज्यात आजपर्यंत तब्बल २ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारं राज्य ठरलं आहे. राज्यात अत्यंत वेगवान पद्धतीने कोरोना चाचण्या होत असल्यानेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहेत. असा दावा सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात येतो.

देशात १५.२५ लाख चाचण्या

भारतात आतापर्यंत ५९,६६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १५.२५ लाखांपेक्षा जास्त कोविड १९ चाचण्या झाल्या आहेत. देशात दररोजच्या कोविड ९ चाचण्यांची क्षमता वाढून ९५ हजारांवर आली आहे. शुक्रवारी एका दिवसांत ८४,६०० कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील इतर राज्यांची तुलना केली असता, राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तर वाढलेला आहेच, परंतु कोरोना चाचण्यांची संख्याही इतर राज्यांच्या तुलनेत जास्तच आहे. 

आकडा वाढता

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत. तर १९ हजार ६३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. तर आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ५२.६४  लाख  लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे

हेही वाचा- Coronavirus Pandemic: राज्यात कोरोनाचे 1089 नवे रुग्ण, तर 37 जणांचा दिवसभरात मृत्यू

सर्वाधिक प्रयोगशाळा

कोरोनाचं अचूक निदान होण्याच्या दृष्टीने कोविड १९ चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा असणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. त्यामुळे राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यावर भर दिला असून, कोरोनाचा उद्रेक झालेल्या भागात चाचण्यांचं प्रमाण वाढण्यासाठी खासगी प्रयोगाशाळांचीही मदत घेतली जात आहे. 

महाराष्ट्रात ९ मार्च २०२० रोजी कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले होते. त्या वेळी कोविड १९ ची चाचणी करणारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा राज्यात होती. त्यातंर राज्यात आतापर्यंत ४३ हून अधिक कोविड १९ चाचणी प्रयोगाशाळा उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३ प्रयोगशाळा सरकारी असून, २० खासगी आहेत.

शिस्त पाळा

दरम्यान, कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत.  हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचाही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी  रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यताही दिली आहे.

लॉकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढेही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.

हेही वाचा- Coronavirus Update: संचारबंदीतही राज्यातील नागरीक मोकाट, तब्बल 1 लाख गुन्ह्यांची नोंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा