Advertisement

Coronavirus Pandemic: राज्यात कोरोनाचे 1089 नवे रुग्ण, तर 37 जणांचा दिवसभरात मृत्यू


Coronavirus Pandemic: राज्यात कोरोनाचे 1089 नवे रुग्ण, तर 37 जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात  शुक्ररी कोरोनाचे 1089 नवे रुग्ण आढळून आले आहे. 169 जणांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 19 हजार 063 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  शुक्रवारी कोरोना या महामारीने सर्वाधिक 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  12 हजार 350 नमुन्यांपैकी  1 लाख 92 हजार  197 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  19 हजार 064 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख  39 हजार 531  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर   गुरूवारी आणि शुक्रवारी  दोन दिवसात 80 जणांचा महामारीने  बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 731 इतकी झाली आहे.

 शुक्रवारी मृत पावलेल्या 37 नागरिकांमध्ये मुंबईतील 25 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 10, जळगाव आणि अमरावतीत प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या 37 मृत्यूमध्ये 19 पुरूष आणि 18 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 37 मृतांपैकी 27जणांमध्ये (73 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

फक्त 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 इतर 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा