Advertisement

Coronavirus update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३५ वर

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी दुपारपर्यंत १३५ वर जाऊन पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

Coronavirus update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३५ वर
SHARES
Advertisement

दर दिवसागणिक महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची (Coronavirus updat) संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे काही रुग्ण काेरोनाच्या विळख्यातून बरे होऊन घरीही परतत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी दुपारपर्यंत १३५ वर जाऊन पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

गुरूवारी पुणे १,सांगली ३, कोल्हापूर १,नागपूर ५ असे कोरोनाबाधित (COVID-19) १० रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३५ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील १२, पुणे ५,औरंगाबाद १ आणि नागपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

या सर्व रुग्णांना आपापल्या घरी रुग्णवाहिकांमधून घरी सोडण्यात आलं. त्यापूर्वी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर स्टाफने रुग्णाचं मनोबल आणि डॉक्टरांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या. 

आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. 
संबंधित विषय
Advertisement