Advertisement

कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन खरेदी करणार- राजेश टोपे

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन खरेदी करणार- राजेश टोपे
SHARES

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स (coronavirus live updates maharashtra government to procure 10000 vials of remdesivir drug for covid 19 patient says health minister rajesh tope) घेण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

या संदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन ॲण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेलं हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलं आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य शासनाने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

हेही वाचा- खासगी प्रयोगशाळांतील कोरोना चाचणी दर येणार निम्म्यावर

आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तिकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणं परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणित पद्धत (एसओपी) तयार केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (ICMR) ने मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर कमी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार कोरोना चाचणी दर निश्‍चित करण्यासाठी राज्य सरकारने ४ सदस्यांची समिती नेमली आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी निःशुल्क होते. तर खासगी प्रयोगशाळांतील कोरोना चाचणीसाठी सुमारे ४५०० रुपये दर आयसीएमआरने निश्‍चित केला आहे. या निर्देशांनुसार खासगी प्रयोगशाळांतील चाचणी दर २३०० रुपयांवर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- मुंबईत हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा