Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १२४७ नवे रुग्ण, दिवसभरात २१ जणांचा मृत्यू

. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४३ हजार ५४५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १२४७ नवे रुग्ण, दिवसभरात २१ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १८१  जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२४७  नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी  दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे १२४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७६ हजार २९४ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ३९१  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४३ हजार ५४५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार  ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१,जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा