Advertisement

राज्यात आज ९१८१ नवे रुग्ण, २९३ जणांचा दिवसभरात मृत्यू

आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५,२४,५१३ झाली आहे.

राज्यात आज ९१८१ नवे रुग्ण, २९३ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...

राज्यात आज २९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ (१८.९१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १०लाख ०१, हजार २६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५,२४,५१३ झाली आहे. 

हेही वाचाः- मालाड ते दहिसर दरम्यान घटतेय कोरोना रूग्णांची संख्या

 आज नोंद झालेल्या एकूण २९३ मृत्यूंपैकी २२१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू ठाणे जिल्हा –९, रत्नागिरी -२, बीड -१, जालना – १, पुणे  १ आणि पालघर १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा