Advertisement

मुंबईत कोरोना पुन्हा वाढतोय; लॉकडाऊन अटळ!

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट असून, ही लाट खतरनाक असल्याचं राज्य स्तरावरून बोललं जात आहे.

मुंबईत कोरोना पुन्हा वाढतोय; लॉकडाऊन अटळ!
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट असून, ही लाट खतरनाक असल्याचं राज्य स्तरावरून बोललं जात आहे. या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना एकाच वेळी कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळं मुंबईत पुन्हा कोरोनानं डोक वर काढलं आहे. परिणामी, मुंबईत लॉकडाऊन होण्याची शक्यता अधिक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत राज्यातील जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला असून, नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई महापालिकेचे अनेक वॉर्ड हे कोरोनाचा हॉटस्पॉट होणाच्या दिशेनं आहेत. काही भागांत कडक निर्बंध लावण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळं मुंबईत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन झाल्यास नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामेरं जावं लागणार आहे.

मुंबईत मागील काही महिन्यांत आटोक्यात येत असलेला करोना पुन्हा डोके वर काढत असून, यावेळीही उपनगरांमधील भाग पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरले आहेत. बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबुर या उपनगरांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नव्यानं त्रासदायक ठरतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महापालिकेनंही पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिकेनं ८५ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली असून, ९९२ इमारती सील केल्या आहेत. मुंबईत साधारण डिसेंबरनंतर कोरोनारुग्ण कमी होऊ लागले. त्यापूर्वी दिवसाला २००० ते अडीच २५००पर्यंत कोरोनारुग्ण आढळत होते. ती संख्या फेब्रुवारीमध्ये ३००च्या टप्प्यात आली. त्यानंतर, १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा खुली केल्यानंतर गर्दी वाढली. तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याचं प्रमाण वाढत गेलं आहे.

३ फेब्रुवारी रोजी ३३४ असलेली सक्रिय रुग्णांची संख्या ६००च्याही वर पोहोचली आहे. त्यात, यापूर्वीही हॉटस्पॉट ठरलेल्या बोरिवलीमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भागात पालिकेकडून काही इमारतींना प्रतिबंधक उपायांवर भर देण्याची सूचना आहे.

अमरावती विभागासह राज्यातील विविध भागांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, मंगल कार्ये-सोहळ्यांमध्ये लोकांच्या उपस्थितीची संख्या मर्यादित ठेवणं यांसारख्या उपाययोजना करून तरीही गरज पडल्यास आठवडाभरानं कठोर निर्बंध लागू करण्यावर मंत्रिमंडळात सहमती झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या सद्य:स्थितीविषयी सादरीकरण करण्यात आले. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा अचानक वाढू लागली असून, बुधवारी ४७८७ नवीन करोना रुग्ण सापडल्याची व ही संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत १ हजारनं जास्त असल्याची माहिती देण्यात आली. प्रामुख्यानं अमरावती विभागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, अचलपूर भागात घरोघरी रुग्ण सापडत असल्याची माहिती देण्यात आली.

कोरोनाविषयक खबरदारीच्या उपायांकडे दुर्लक्ष, शेकडो-हजारोंच्या गर्दीत सुरू झालेले मंगल सोहळे-कार्यक्रम यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचं अनेक मंत्र्यांनी नमूद केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा